
जे उत्तम असते त्याला marketing ची आवश्यकता नसते.आजच्या स्पर्धायुगात हा
concept थोडा विरोधात्मक असला तरी अस्सल कलाकृति ही अस्सलच असते त्याचे एक
उदाहरण.पहिला extract साने गुरुजींच्या "कला" पुस्तकातला आहे तर दूसरा २
जून "लोकसत्ता" मधला.अर्थात ,गीताई रचनेमागे विनोबाजींचा आर्थिक दृष्टीकोन
मुळीच नव्हता.परन्तु एखाद्या MBA गुरुने अशा विक्रीचे उद्दातीकरण करत
रोयल्टी सकट विनोबाजीं करोडपति कसे झाले असते याचे गणित मांडले असते आणि
दुसर्या एखाद्याने त्याची वाहवा करत आभार प्रदर्शन केले असते तर कदाचित
काही नवल झाले नसते ! असो .असे अनेक लोक आहेत की ज्यानी उत्तमातले उत्तम
विनामूल्य देऊन संपूर्ण विश्वसमाज उपकृत करून ठेवला आहे.
काहीच दिवसापूर्वी "गुरुपौर्णिमा " होउन गेली .साने गुरूजी अणि पूज्य विनोबाजी यांना या निमित्ताने सादर प्रणाम !