Tuesday, September 2, 2014

कविता

 
प्रेमा तुझा रंग कसा ?
-किरमिजी ढग जसा.

प्रेमा तुझा स्पर्श कसा ?
-मऊ मऊ ससा जसा.

प्रेमा तुझा गंध कसा ?
-दरवळता चाफा जसा.

प्रेमा तुझा बोल कसा ?
-अबोलता अश्रू जसा.

प्रेमा तुझा चेहरा कसा ?
-डोळ्यातला भाव जसा.

"प्रेमा जरा येशील ना ?
   मनी दाटशील ना?
ओढाळश्या लयीतून
   गात्री भिनशील ना?"