Wednesday, June 3, 2020

'मी' आणि 'तु'.....

हे राजन् ,
माणूस इतरांचा चेहरा पाहू शकतो पण स्वतःचा नाही.स्वतःच स्वतःला कसे पाहायचे?
ते शक्य नाही.म्हणुनच कि काय विधात्याने जोडीदार बनवला
आणि या 'मी मी' बरोबरच 'तु' ला बनवले.
जग निर्माण केले.....
आता गंमत अशी की या 'मी' शिवाय 'तु' अपूर्ण आहे तर 'तु' वाचून 'मी' !
हा खेळ मांडून देव मात्र पळून गेला 
आणि माणसांच्या वाट्याला आले मात्र भोगवटे
आनंदाचे,दु:खाचे.मिलनाचे आणि विरहाचे.....
जेव्हा जेव्हा 'मी' वाचून 'तु' अथवा 'तु'वाचून 'मी' एकटा पडतो
तेव्हा त्यांच्या सोबत असतात केवळ आठवणी.
क्षणांच्या,दिवसांच्या,जन्मांच्या किंवा जन्मजन्मांतराच्या.....
आठवणी जपता येतात पण जगता मात्र येत नाहीत.
'मी' चा चेहरा पुन्हा एकदा हरवतो
आणि पळुन गेलेला देव मात्र हसत राहतो !





मैना...