मुक्ते ,
प्रत्येक तथाकथित विध्वंसामागे एक निळे क्षितिज दडलेले असते.जसे गोमती नदीच्या काठी असणारी अमर्याद विस्तृत वाळू आणि श्री कृष्णाने लौकीक भक्तांना दिलेला अनाकलनीय वियोग.पण एखादीच मीरा मात्र त्या क्षितिजात विलीन होऊ शकते आणि तिची वाळूवर उमटलेली पाउले ही एकच वैभवरेषा त्याच वाळूला चिरंतन चैतन्य बहाल करते.आणि मग असंख्य पिढ्यांच्या ललाटरेषा शकुनतेने पुलकीत होतात.
काल परवाचीच गोष्ट ,एक रस्त्यालगत राहणारी लहान मुलगी तिच्या आईचा हात सोडून माझ्याकडे आली.मी तिला पैसे देऊ केले ,खाऊ देऊ केला पण ते सगळ तिने नाकारल.माझा हात धरून खेळण्यात ती इतकी रमली की माझा मलाच विसर पडावा.आणि तिच्या निरागस डोळ्यात पुन्हा तेच अमर्याद निळं क्षितिज !
आणि माझ्याही डोळ्यात -
"आंखोमे आसूंओके मरासिम पुराने है।
महमां ये घर मे आये तो चुभता नही धुआं।।"
आणखी काय बोलू?
No comments:
Post a Comment