Wednesday, August 3, 2016

भातुकली

हे राजन् ,  
काळाची सत्ता फक्त या शरीरावर चालते.आत्मभानावर नाही.
तरीही कोणत्या आदिम प्रेरणेने हे मेले शरीर हलत असते ,डुलत असते ? 
कोण कोणाला भातुकलीच्या या खेळात झुलवत असते?

मायावी मारीच्याची समज सीतेला नव्हती?
येणा-या काळाच्या भयसूचकतेचे संकेत श्रीरामाच्या अर्धांगिनीला कां कळत नव्हते?
पण तिचा खेळच वेगळा होता.
दिव्यत्वाचे लेणे पांघरून आलेली सीता कुठल्याही अटीवर ,सबबीवर 
आपले बालपण हरवायला तयारच नव्हती.पुढचे रामायण सर्वविदीत आहे.
या खेळात तिची काही गाडकी-मडकी फुटलीही असतील.असू देत.
पण तरीही तिने हा खेळ मांडला ! 
मागे पुढे आकांतच आकांत उभा केला.
आपण मात्र अशा हलत्या डुलत्या शरीरावर उगीचच आत्म्याचे थोर पहारे बसवून देतो.
सर्व वेदान्ताची उगीचच पोपटपंची करतो.
त्या ऐवजी अश्रूंचा आधार घ्यावा.
निसर्गाने माणसाला दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे.
जिभेपेक्षा डोळे अधिक बोलके असतात ,
पण डोळ्यांना ज्या अनेक भाषा अवगत असतात ,
त्यात अश्रूंइतकी प्रसन्न ,भावनापूर्ण आणि ह्रदयंगम अशी दुसरी कुठलीही भाषा नाही !


"अश्रूंना नाही रूप नि कसला रंग
का व्यर्थ जुळविता ओवी आणि अभंग
जाणारा जातो ,अनंत आहे काळ
 तरीही मांडावा भातुकलीचा हा खेळ "

Life and Death


Is there a division between life and death?
why do we regard death is something apart from life?
why are we afraid of death?
In other words ,is it possible ,while living ,to die 
which means coming to an end ,being as nothing?

In this world where everything is becoming more and more 
or becoming less and less ,
where everything is climbing ,achieving ,is it possible in such a world 
to know death?

Is it possible to end all memories ,not the memory of facts ,
the way to your house and so on,
but the inward attachment through memory 
to psychological security ,through which one seeks security ,happiness?
Is it not possible to put an end to all that-which means 
dying everyday so that there may be renewal tomorrow?

It is only then that one knows death while living.
Only in that dying ,putting an end to that continuity ,

is there renewal ,that creation which is eternal ................!

-K

कालाय तस्मै नमः


हे राजन् ,

जीवनात दु:खाचे अपरिहार्य अस्तित्व का असावे याचे कारण कधीच सापडत नाही. 
पण त्या दु:खाला कसे तोंड द्यावे ते काऴ शिकवित असतो.
माणूस मात्र जीवनाकडून हिशेब मागत असतो.
जसे काय जीवन म्हणजे गणिताचा पेपर किंवा भूमितीचा सिद्धांत.
मला वाटते ,असल्या समस्यांची उत्तरे शास्त्रे देऊ शकत नाहीत.
पण जी शक्ती गणितात नसते ती कलेत असते.
कला ,तत्वज्ञान आणि अनुभव यांच्या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले 
अद् भूत रसायन म्हणूनच जीवनाला सामोरे गेले पाहीजे.
मग सारी कोडी सुटतात.त्याचे स्वरूप हे ज्याचे-त्याचे वेगळे असू शकते. 


"कालो: गुरू । कालाय तस्मै नमः।।"


"नेहमीच नाही ,पण कधी असेही घडते
करकरीत वास्तवा जरीकिनार जडते
नेहमीच नाही ,पण कधीतरी असे होते
माती पदरी भरता रत्न हातासं येते"