असा जीना प्रत्येकाला कधी ना
कधीतरी भेटलेला असतो .पण हा काळ थोडा जुना म्हणजे साधारण ३०-३५
वर्षापूर्वीचा आहे.घरे छोटी दोन वा तीन मझली.लिफ्टची गरज नसायची.ये जा
जिन्यावरुनच.जिन्यात काहीसा उजेड काहीसा अंधार.कवी मनाला मग आठवतात काही
अलवार कोमल आठवणी ,अंधारातले थोडे धडपडणे,चोरून चोरून केलेल्या काही हरकती
ज्याना छतावरची पाल साक्ष आहे.कवीला मग त्या नागमोडी वळणाचे गमक
कळते.त्याला तो इतका आवडतो आहे की स्वर्गाच्या सोपानाला ही असे नागमोडी
जीन्याचे वळण असावे अशी त्याची इच्छा आहे..
कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला
जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड
मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा
वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी
जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी
मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे
- वसंत बापट
कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला
जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड
मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा
वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी
जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी
मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे
- वसंत बापट
No comments:
Post a Comment