| तू माझ्या आत खोल डोकाउन पहा. मी तुला कधीही माझ्या भयाण खोलीची भोवळ येऊ देणार नाही. अविश्रांत आठवणींचे तु मला दिलेले देणे मी कसा विसरू? त्या घनदाट असल्या तरीही त्यांच्या कपाळावर मऊ अलवार मातीचा भांग पाडता येईलच आणि त्या भांगेत सृजनाची चिमुकली तुळस उगवेलच उगवेल ! या काचमण्यांच्या भातुकलीच्या खेळात माझा जीव अगदी चोळामोळा होत असतो पण त्याचवेळी मेंदूच्या कवटीला केलेल्या सूक्ष्म गोंदणतारांनी तो गोळाही होत असतो. निर्सगाची ही आपल्यावर केवढी कृपा?वारा येतो ,कधी आभास बरोबर घेउन येतो आणि त्या भासातून समीरसत्याची गूढ शीळ देऊन जातो. "घन जमतिल तेव्हा जमतिल वा-याचे अलगुज खोटे? हे दु:ख मिठीचे तोवर हाडांना घेउन पेटे.." पण तूर्तास या दुपारी चमचमणा-या भरतीच्या सागरलाटांवर स्वार होउन विभ्रमस्वप्नांची धुंद लकेर हा का बरे गातोय ? "पुनवेचा चंद्रम आला घरी चांदाची किरणं दर्यावरी चांदण्याच्या चु-यात खा-या खा-या वा-यात तुझा माझा एकांत रे साजणा..." |
!->
Tuesday, September 8, 2015
पुनवेचा चंद्रम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment