Monday, June 6, 2016

गुलमोहर

आपल्याच दु:खात बुडून जाण्यापेक्षा थोडीशीच ,पण दुस-यांची जाण ठेवली तर?
कटू शब्दांचे बाण सुटायच्या आधी थोडासाचं पण संयम दाखवला तर?
एक साधासा गुलमोहर ,तोही मनासारखा बहरायची वाट पाहावी लागते.
नाही बहरला ,कोसळला,तरी आपण कोसळायच नसतं.तोल सुटू द्यायचा नसतो.
स्वतःच्या 'मी' पणात एवढं आत्मकेंद्रीत व्हायचं नसतं...

हसू नको ,मला माहीत आहे तुला काय म्हणायचं आहे.

"तु जिथे बघशील जे जे ,मी तुला दिसणार ते ते
तू मला ठेवू नको मांडून देव्हा-यात एका"

No comments: