Tuesday, June 21, 2016

मनात

हे राजन् ,
असण्यामध्ये सगळेच असतात पण नसण्यामध्ये असण्यालासुद्धा एक अर्थपूर्ण आशय असतो.
कांद्याची एक एक पाकळी सोडवता सोडवता शेवटी काय उरते? 

"उकल" ,नसूनही असण्याची !

कधी कधी आकाश भव्य वाटते , पाणी चवदार लागते , तोच तोच स्पर्श नवा वाटतो , 
तिच ती सरगम एक नवी समज देउन जाते . 
हे असं का घडतं कारण नाविन्य वस्तुत नसते ,असण्यात नसते.
ते असते "मनात".
आणि मनाला आजवर कुणीच पाहीलेलं नाही.....

No comments: